|| वारली चित्रकला उपक्रम - माहिती : ३० जून २०१७ ||

11 views
Skip to first unread message

Warli Painting

unread,
Jul 14, 2017, 3:39:13 PM7/14/17
to AYUSH google group

*|| वारली चित्रकला उपक्रम - माहिती : ३० जून २०१७ ||*

 

जोहार !

आज पर्यावरणजैव वैविध्यनैसर्गिक संसाधनेस्वावलंबी पणामानवी मूल्य जतन करून शाश्वत विकासाच्या खात्री साठी पारंपारिक ज्ञानात प्रचंड क्षमता आहे. आणि गेल्या हजारो वर्षा पासून जगभरातील आदिवासी समुदाय हे सगळे सहज दैनंदिन जीवनशैलीत प्रत्येक्ष जगतो आहेत्याचे जतन व संवर्धन करून आपल्या ग्रहाच्या उज्वल भविष्यासाठी प्रोत्साहन देवूया !

 

हा एक प्रयोग आहेआपण पण आपल्या परिसरात याहून अधिक उत्तम उपक्रम सुरु करावेत किंवा अशे उपक्रम प्रभावी करण्याकरिता हातभार लावूया. *आपल्या उर्जा/ज्ञानाचा/कौशल्याचा उपयोग समाज हिता साठी व्हावा हि प्रामाणिक इच्छा!*

या महिन्यातील काही घडामोडी आपल्या माहिती साठी उदाहरण म्हणून,

 

[अदिकला]

*१) CSR उपक्रम अंदाज पत्र* : भारतीय राष्ट्रीय भुगतान निगम यांच्या मुंबई येथील कार्यालयात उपक्रम विषयी प्राथमिक प्रस्थाव सादरीकरण बैठक मुंबईच्या कार्यालयात झाली होती. सध्या प्राथमिक प्रस्तावावर चर्चासविस्तर नियोजअंदाज पत्र बनविणे चालू आहे. ऑगस्ट मध्ये पुढील उच्च स्थरीय बैठक होणार आहे त्यात निर्णय होईल.

 

*२) वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेट देण्यासाठी वारली चित्र* : मुंबई आणि बंगळुरू येथील वेलिंगकर इन्स्टिटयूट मध्ये त्यांच्या पाहुण्या अधिकाऱ्यांना भेट देण्यासाठी वारली चित्रांची मागणी संजय दा पऱ्हाड आणि सुभाष दा वनगाधाकू दा कडूविजय दा वाडुमंगेश दा कडूसुभाष दा वनगानिलेश दा शिवराम दा गोजरा  यांनी पूर्ण केली

 

*३) सुवास ट्रस्ट साडी चित्रीकरण प्रकल्प* - सुवास ट्रस्ट तर्फे साडीवर चित्र काढण्यासाठी चर्चा पूर्ण झाली प्रायोगिक तत्वावर २ नमुने संजय दा पऱ्हाड करत आहेतत्यानुसार सविस्तर चर्चा करण्यात येईल. हा प्रयत्न यशस्वी झाल्यास कोईंबतूरसुरतपश्चिम बंगाल येथून सिल्क आणि कॉटन च्या साड्या चित्रीकरणासाठी पाठवल्या जातील.

*या ट्रस्ट तर्फे गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत केली जाते. आपल्या संपर्कात गरजू असल्यास ३० जुलै पर्यंत सदर वेबसाईट वर अर्ज करण्यास सांगावे*  (www.trustsuvas.org)

 

*४) संयुक्त राष्ट्र विकास प्रकल्प महाराष्ट्र चे (United Nations Development Programme, Maharashtra), कार्पोरेट कन्सल्टन्ट* गंधार देसाई यांनी संपर्क केला होतावारली चित्रकला संदर्भात पालघर मध्ये काही उपक्रम आराखडा बनविण्याकरिता काही माहिती हवी होती. सदर विषयवार सविस्तर चर्चा करण्यात येणार आहे.

 

*५) टेलिकॉम कंपनी तर्फे कलाकारांना वितरक म्हणून चौकशी* : रिलायन्स जीओ चे नवीन प्रॉडक्ट्स ग्रामीण परिसरात वितरण आणि विस्तार व्हावा या साठी एक वेगळी पद्धत अवलंबिण्यासाठी कलाकारांतर्फे वितरण व्हावे यासाठी कंपनीची तर्फे चौकशी करण्यात आली होती. पण त्यांना अपेक्षित जन संपर्क ५ लाख पेक्षा जास्त असल्याने चर्चा पुढे जाऊ शकली नाही.

 

*६) आगामी महिला विशेष उपक्रम* -

परंपरागत आदिवासी समाज महिला सशक्तीकरण करिता आदर्श मानले जाते. पण सध्या बदलत चाललेल्या (इत्तारांचे अंधानुकरण) घडामोडी मुळे समाजात असलेले स्त्री चे महत्व या विषयी पुन्हा जागरूकता करण्याचे प्रयत्न होणे गरजेचे आहे. सुयीनसवासीनधवलेरीकऱ्हवलीइत्यादींचे सांस्कृतिक महत्व सोबत महिलांचा सामाजिक कार्यात सहभागआर्थिक सशक्तीकरण या साठी एक नवीन उप्रकम चालू करतो आहोत.

ज्यांना कुणाला पिशवी शिवणेपर्स शिवणेवस्तूवर चित्र काढणेकपड्यावर चित्र काढणेकागदाच्या वस्तू बनवणेसोंगे बनवणेबांबूच्या वस्तू बनवणेगवताच्या शोभिवंत वस्तूटोपीसंगीत साहित्यपारंपरिक खेळाचे साहित्यग्रीटिंग कार्डपत्रिकाशुभेच्छा पत्रभिंतीवर चित्र काढणेइत्यादी कार्याची आवड आहे आणि त्यात रोजगार करू इच्छितात अश्या निवडक ५० महिलांचा चा गट बनवून प्रायोगिक तत्वावर उपक्रम राबवणार आहोत. इच्छुकांनी त्वरित संपर्क करून नाव नोंदणी करावी.   

 

*७) इ-मार्केट मध्ये स्पर्धा करूया*

वारली चित्र/आदिवासी कलाकृती विक्री साठी आपले स्वतःचे संकेत स्थळ आहेच (www.warli.in ) सोबतविविध कंपन्या सोबत केलेले करार आपल्या कलाकृती साठी अधिक प्रभावी प्रसारा साठी उपयोगात येईल यात शंका नाही-

 

(नोंदणी/करार पूर्ण - विक्रीसाठी तयार) : फ्लिपकार्टअमेझॉनइबाय एक्स्पोर्ट्स इंडिया उंगली डीलपेटीएम, ciitrade.in, Shilpakala.com, artsofindia.com, greatindianbasket.com, loveknits.org, indiakala.com, theartbazaar.in, BuffyFish, Unexplora, Puro Kraft, हस्त वेमा. ->> यादी आणखीन वाढते आहे.

(आवश्यक निधी अभावी lagin.in आणि warlikala.com ई कॉमर्स वेबसाईट चे नूतनीकरण न केल्याने सध्या बंद आहे.) -

 

*८) इत्तर काही* :

मुंबई येथून फ्री प्रेस मधून जानवी पाल या महाराष्ट्रातील कला आणि संस्कृती जतन या विषयावर लेख लिहत आहेत त्यात वारली चित्र संस्कृती बद्दल प्रतिक्रियांसाठी मुलाखत घेतली. हा लेख १९ जुलै रोजी प्रकाशीत होईल.

मुंबई येथून मानस धुरू वारली पेंटिंग वर डॉक्युमेंट्री बनवत आहेत ते मुलाखती साठी संपत दा ठाणकर आणि संजय दा पऱ्हाड यांच्या भेटीसाठी १५ व १६ जुलै ला डहाणू येथे येत आहेत

अहमदाबाद येथील आर्किटेक्चर महाविद्यालयातील विद्यार्थिनी धरती गज्जर वारली चित्रकला आणि संस्कृती हा विषय घेऊन आर्किटेक्चर प्लान बनवत आहेतपूर्ण झाल्यावर महाराष्ट्र आणि गुजरात शासनाला सुचवणार आहेत. त्या लवकरच पुन्हा डहाणू ला भेट देणार आहेत

 

[Most Urgent!!] *९) वारली पेंटिंग चे लोगो असलेल्या ट्रेड मार्क नोंदणी विरोधात आक्षेप नोंदविणे*  

नेदरल्यांड येथील फर्स्ट टेक्नॉलॉजि या कंपनीने वारली पेंटिंग असलेले दिवे या साठी ट्रेडमार्क मुंबई येथील बौद्धिक संपदा विभागा तर्फे प्रकाशित जनरल मध्ये  सदर प्रकरण प्रकाशित केले गेले आहे (५ जून २०१७)नियमा नुसार २ महिन्याच्या आत या विषयी आक्षेप नोंदवू शकतो.

 

सदर कला आदिवासी समाजाचे पारंपरिक ज्ञान आणि बौद्धिक संपदा आहेयावर कोणतीही संस्था/कंपनी/व्यक्ती स्वामित्व मिळवू शकत नाही. वारली चित्रकलेचे बौद्धिक संपदा कायद्या अंतर्गत भौगोलिक उपदर्शनी मध्ये नोंद हि झालेली आहे. त्या साठी आपण सदर कार्यालयात लीगल एक्स्पर्ट मार्फत आक्षेप नोंदविणार आहोत.

 

या विषयी शासकीय पातळीवर चर्चा व्हावी या साठी लेखी अर्ज १९ जून रोजी पाठवले आहेत : राष्ट्रीय अनुसूचित जमाती अयोग चेअरमनसदस्यविभागीय कार्यालयमहाराष्ट्र राज्य राज्यपालआदिवासी विकास मंत्रीआदिवासी विकास सचिव महाराष्ट्र व गुजरातआदिवासी विकास कमिशनरआदिवासी विकास अप्पर कमिशनर ठाणेकमिशनर आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था महाराष्ट्र व गुजरातप्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प डहाणू

डहाणू प्रकल्प अधिकारी आंचल गोयल (IAS) यांच्याकडून १७ जून रोजीपालघर खासदार Adv. चिंतामण वनगाडहाणू आमदार पास्कल धनारेडहाणूचे माजी खासदार आणि आमदार कॉ. लहानू सिडावा कोम (आदिवासी प्रगती मंडळ)जगन्नाथ कुवर (आदिवासी वारली बहू उद्देशीय विकास संस्था) यांच्या कडून सपोर्टींग लेटर मिळाले. (आपल्या संपर्कात असलेल्या जास्तीत जास्त आदिवासी संस्था कडून सदर पत्र द्यावे )

अहमदाबाद येथील ADV अटॉर्नी श्रुती शहा यांच्या मार्फत अर्जाचे ड्राफ्ट करून आयुश तर्फे ट्रेडमार्क कार्यालयात सादर केले जाईल 

जव्हार येथील नामवंत ADV संदीप कुरकुटे हे अर्जाच्या ड्राफ्टिंग साठी मार्गदर्शन करणार आहेत.

 

*१०) सहकार्य आणि सहभाग*:

सदर रोजगार निर्मितीच्या उपक्रमला मजबूत करण्या साठी आपण विविध मार्गाने सहभागी होवू शकता. ओन लायीन : मार्गदर्शनमाहितीची देवाण घेवाणनवीन आयडिया देणेजाहिरात करणे

तांत्रिक सहकार्य : चित्रीकरणफोटो एडिटिंगलिखाणटायपिंगभाषांतर करणे

उपक्रम सहभाग व दायित्व : प्रत्येक्ष मार्गदर्शनउपक्रमात स्वयंसेवक म्हणून सहभागी होणेउपक्रमाचे नेतृत्व करणे

ग्रामीण संपर्क : नवीन कलाकारांना जोडणेयुवाना मार्गदर्शनसंपर्क वाढवणे,

आर्थिक साहाय्य : वर्गणी देवून सभासद होणेवार्षिक/मासिक स्वरुपात आयुश संचय निधी मध्ये संकलन करणेआर्थिक सहकार्य कारानार्यासोबत संपर्क करून देणे

 

*१२) वारली चित्रकला उपक्रम : जन सहयोग निवेदन*

पहिल्यांदाच आयुश तर्फे काही आत्यंतिक महत्वाच्या उपक्रमासाठी आर्थिक सहकार्याचे निवेदन केले होते. (१३ जुन २०१७)

निधी प्राप्त : चेतन गुराडा (रु १५,०००)उमाशंकर भिमाजी चौधरी (रु २,५००)

निधी अवाक : संजय पऱ्हाडधाकू कडूविजय वाडुमंगेश कडूसुभाष वनगानिलेश शिवराम गोजरा (रु १०,२००)

नॅसकॉम फौंडेशन / बिग टेक तर्फे आयुश ला अँटी व्हायरस सॉफ्टवेअर सावलीतच्या दारात मिळाले

भविष्यातील वारली पेंटिंग साठी इंटरनेट वरच्या ऍक्टिव्हिटी अधिक प्रभावी बनविण्या करीत सेल्स फोर्स तर्फे NGO सपोर्ट मार्फत मोफत १० यूजर्स चे लायसन्स मिळणार आहेत्यासाठी नोंदणी केली आहे. (महिन्याची १५० डॉलर एका युसर ची फी आहे). सेल्स फोर्स वर सयद होसन आठवड्यातून १० तासशिकागो येथून अनिल सिंग यांनी आठवड्यातून १० तास आयुश ला देण्याचे तयारी दर्शविली आहे 

- IPR एक्स्पर्ट मंगेश मोकाशी सध्या कॅनडात आहेतआंतराष्ट्रीय पातळीवर भौगोलिक उपदर्शनी चे पालन आणि त्यासाठी उपायोजना करण्यासाठी मोलाचे मार्गदर्शन केले. त्यांच्या मार्गदर्शनाने आंतराष्ट्रीय उपक्रम नियोजन करणे आहे.

 

अधिक माहिती साठी काही लिंक्स -

या उपक्रमाच्या अपडेट्स - https://groups.google.com/forum/#!tags/adiyuva/Warli

उपक्रमात सहभागी होण्या करण्या करिता येथे (www.join.adiyuva.inनोंदणी करावी

 

Towards constructive tribal empowerment, Lets do it together! | www.warli.in

संपर्क : ०९२४६ ३६१ २४९ay...@adiyuva.in

 

Warli Painting is registered geographical Indication, Its Traditional knowledge and cultural Intellectual of Adivasi community!

Aim of  this Initiative through Warli Painting

माती : Land – Preserve our Cultural Intellectual & Traditional Knowledge

पानी : Water – Earn competitiveness by Skill Development and promote Traditional knowledge through New technology

चावूल : Rice – Enable Artisan and Adivasi community for strengthening its sustainable economy by employment generation

चेतन Chetan

unread,
Jul 15, 2017, 6:42:23 AM7/15/17
to adi...@googlegroups.com
company like reliance jio should not be entertained at all. they are already looting our land under SEZ. by putting their own money or money taken on loan from various nationalized banks on initial phases they are bringing unwanted competition and make other company to die. after that they raise the price to recover money and enjoy. their family membr are enjoying luxury some are wearing dress worth 100cr. at the cost of life of poor who had to give away their land. we must put certain restriction on our self while diong such adventures. some of the deals are like peopl want to use us for varli painting as cheap labour provider and after than  they want to make profit on by selling varli products on their own brand/name. we should stop such practice and focus on getting raw material and sen it as completely finished product.

--
Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
---
You received this message because you are subscribed to the Google Groups "AYUSH | adivasi yuva shakti" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email to adiyuva+unsubscribe@googlegroups.com.
To post to this group, send email to adi...@googlegroups.com.
Visit this group at https://groups.google.com/group/adiyuva.
To view this discussion on the web visit https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CAHMsEBtT5UL_UCLPqpq3JgeiwSxuRXTFxHEHhuYTbUGgTfCLvQ%40mail.gmail.com.
For more options, visit https://groups.google.com/d/optout.



--
चेतन व. गुराडा.
Chetan V. Gurada.

Assistant Professor,
University Department of Physics (Autonomous),
University of Mumbai
Lokmanya Tilak Bhavan, Vidyanagari, Santacruz (E), Mumbai - 400 098.(India)
mobile - 9869197376
e-mail: che...@physics.mu.ac.in
           che...@mu.ac.in
Reply all
Reply to author
Forward
0 new messages